हाच खरा गौरव, तृतीयपंथीयांनी केले झेंडा वंदन

पुणे : संपूर्ण देशभरात 72 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, आज पुण्यामध्ये गरुड गणपती मंडळाच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजातील दुर्लक्षित घटक असणाऱ्या तृतीयपंथी समुदायाला आपले स्वातंत्र्य साजरा करता आले आहे.

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात  संविधानाने सर्वाना समान अधिकार दिला आहे. स्त्री – पुरुषांप्रमाणे  समाजातीलच एक घटक असणाऱ्या तृतीयपंथीयांना समान वागणूक देणं गरजेचं असताना, तस होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी देखील या समुदायाला आपल्या देश बांधवांच्या आनंदात सहभागी होता येत नाही. पण आज या सर्व गोष्टींना फाटा देत गरुड गणपती मंडळाच्या पुढाकारातुन तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आहे.

यावेळी तृतीयपंथी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या चांदणी गोरे, पन्ना दीदी,  गरुड गणपती मंडळ अध्यक्ष सुनील कुंजीर, अजिंक्य कुंजीर, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केवळ व्हाट्सएपला फोटो न ठेवता, तिरंग्यातील प्रत्येक रंग देशवासियांना अंगिकारणे गरजेचं आहे. प्रत्येक भारतीयाला संविधानाने समान अधिकार दिला आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हालाही देशाचे स्वातंत्र्य साजरा करता आला याचा आनंद असल्याचं चांदणी गोरे यांनी यावेळी सांगितले.

मनुस्मृतीत सर्वांना समान अधिकार – शंकराचार्य

You might also like
Comments
Loading...