पुणे : एकनाथ शिंदेच्या बंडा नंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत काही निर्णय घेतले या मध्ये औरंगाबादच नामंत्रण करून संभाजीनगर आणि उस्मानाबादच धाराशिव अशी दोन शहराची नावे बदलली. या निर्णयाचा काही ठिकाणी विरोध होताना बघायला मिळत आहे. आज एम.आय.एम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे मोर्चा काढण्यात आला या वेळी त्यानी महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शनने केले. संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे आक्रमक झाले आहे.
या मोर्चा विरोधात आत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. या बाबत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले . छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद जिल्ह्याला दिलेला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. राज्य सरकारने संभाजीनगर नामांतराचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सगळा विषय संपला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कुणीही विरोध करू नये.एम.आय.एम चे खासदार इम्तियाज जलील जाणीवपूर्वक मोर्चा काढून विरोध करत आहेत. औरंगजेब हा इम्तियाज जलील चा बाप आहे का.? नाव बदलल्यामुळे का पुळका येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर संस्कार आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रू मेल्यानंतर धर्मसंस्कारानुसार त्याचं थडगं इथेच बांधलं. लोकांना इतिहास कळावा म्हणून ते सुरक्षित ठेवलं. मात्र तिथे कुणीही औरंगजेब प्रेमी जात नाही, तशी जमात उपलब्ध नाही. मात्र एम.आय.एम चे लोक इम्तियाज जलील आणि त्यांचे नेते त्याच औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक झाले, त्यांनाच तसा पुळका येत आहे. मात्र घाणेरडी वृत्ती मनात ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचे जिल्ह्याला दिलेल्या नावाला विरोध करू नये, अन्यथा गाठ शिवप्रेमींची आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<