राष्ट्रवादीकडून या विद्यमान खासदारांना मिळणार संधी; ही ११ नावे निश्चित?

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 11 विद्यमान खासदारांना संधी मोलणार असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा मतदारसंघांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती – सुप्रिया सुळे, सातारा – उदयनराजे भोसले, कोल्हापू – धनंजय महाडिक, भंडारा-गोंदिया- मधुकर कुकडे या विद्यमान खासदारांना पून्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.

तसेच नाशिकमधून समीर भुजबळ, बुलडाणा- राजेंद्र शिंगणे, ठाणे- संजीव नाईक,रायगडमधून सुनील तटकरे, उस्मानाबाद अर्चना पाटील किंवा राणा जगजितसिंह पाटील, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.