‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’ मुख्यमंत्र्यांचे हे एकच धोरण- धनंजय मुंडे

इंदापूर : ‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण असल्याची कणखर टीका धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. या सरकारमधील १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला क्लीनचीट दिली. असेही मुंडे म्हणाले.

इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते, यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. आज राज्य सरकारची कार्यपद्धती पाहता हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार असे दिसत आहे. मुख्यमंत्री प्रत्येक भ्रष्टाचारी मंत्र्याला क्लीन चीट देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’ हे सरकारचे एकमेव धोरण असल्याचा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. या पूर्वी राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करत भाजप सरकावर कणखर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नुकतीच निवड झाली. निवडीपूर्वी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी सोपवेल म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुंडेना पवारांनी डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, शेतकरी मेळाव्यात बोलतांना धनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत. त्याला गाय माहित आहे . तिची सड माहित आहे. अशी गमतीशीर खिल्ली अजित पवारांनी उडवली.