हे तर राष्ट्रवादी प्रेरीतच भाजप..!

भाजप

अहमदनगर : शेवगाव मध्ये भाजपचे नेते व भाजपचे मा. पंचायत समिती सभापती ऍड. अविनाश मगरे यांनी शिवसेना दक्षिण प्रमुख शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत शेवगाव मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेवगाव येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी पार पडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा प्रवेश झाला आहे.

प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेपेक्षा जनतेच्या प्रश्नाला व समस्यांना प्राधान्य क्रम देण्याचे धोरण सतत घेतलेले आहे. शिवसेनेचे बोट धरून केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने जनतेचा भ्रम निरास चालविल्याने येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण असल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात शिवसेनेची संघटना भर भक्कम होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाढे यांनी व्यक्त केली.

ऍड.मगरे बोलताना म्हणाले की स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा भाजप आता राहिला नाही. हे तर राष्ट्रवादी प्रेरीतच भाजप आहे. शेवगावतील गटबाजीमुळे शेवगाव शहर बकाल होत आहे व शेवगाव शहरात भाजपचा एकही नगरसेवक निवडून येनार नसल्याची खंत मगरे यांनी व्यक्त केली.

Loading...

जि.प.सदस्य अनिल कराळे, संपर्क प्रमुख एकनाथ कुसळकर, तालुका प्रमुख भारत लोहकरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आजच्या बैठकीत ऑड.मगरे यांनी शिवसेनेचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. येत्या १३ फेब्रुवारी रोजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा रीतसर शिवसेना प्रवेश होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शहरप्रमुख सुनील जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी अप्पा कुलकर्णी, ऑड.लक्ष्मण बोरुडे, शिवाजी मडके, अरुण गर्जे, अशोक लाड, तानाजी मोहिते, संजय लहासे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

2 Comments

Click here to post a comment