मुंबई: आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. असा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?,भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात?”, आता संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युतर दिले आहे.
“सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या… तुमचाही हिशोब होईलच “, असे ट्विटर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.
सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या…
तुमचाही हिशोब होईलच ! pic.twitter.com/Q1vqrEukBu— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2022
असेही संजय राऊत म्हणाले –
आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. “शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही. शिवसेना पक्ष आमच्या रक्ताने बनलेला पक्ष आहे. शेकडो लोकांनी यासाठी बलिदान दिले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. या संकटाला आम्ही एक संधी समजतो. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आज लाखो शिवसैनिक आहेत. पक्ष मजबूत आहे. आजच्या कार्यकारिणी बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होतील .आजची बैठक राजकारण आणि देशाला दिशा देणारी ठरेल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<