मोशी येथे घडला ‘हा’ भीषण प्रकार, वाचाल तर व्हाल थक्क !

four people dead in road accident at Beed

टीम महाराष्ट्र देशा : मोशी येथे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाचालकाने नाशिक-पुणे-सांगली या मार्गाची बस अडविली. त्यावरून बस चालक व रिक्षाचालक यांच्यात वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या बस वाहकालाही शिवीगाळी करून रिक्षाचालकाने वाहकाला फरफटत नेले. यात वाहक जखमी झाला.

श्रीकांत मालीस (वय ३८ , रा. कुपवाड, ता. मिरज , जि. सांगली ) असे जखमी झालेल्या वाहकाचे नाव आहे. तर अशोक दिनकर काळकुटे (वय ३३ रा. जयसिंगपूर , जि. कोल्हापूर ) असे बसचालकाचे नाव आहे. या प्रकाराबद्दल वाहकाने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहक श्रीकांत गुरव व चालक अशोक काळकुटे हे दोघेही नाशिक-पुणे-सांगली मार्गावर बस घेऊन जात होते. त्यावेळी मोशी येथे विरुद्ध दिशेने एक रिक्षा आली. पुरेसा रस्ता असतानाही रिक्षाचालकाने रिक्षा बससमोर थांबवली. त्यामुळे बस चालक रिक्षा चालकाला म्हणाले , "रिक्षा निट चालव , रस्ता रिकामा आहे. तेथून जा" त्यामुळे अनोळखी रिक्षा चालकाने बस चालकाला शिवीगाळी केली. हा वाद मिटवण्यास बस एक वाहक खाली उतरून गेला व त्याने रिक्षाचालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. वाहक रिक्षावर हात ठेऊन उभा होता. रिक्षाचालकाने त्याकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालू केली वाहकाचा हात अडकलेला असल्याने वाहक रीक्षाबरोबर फरफटत गेला बस मधील प्रवासी व आजूबाजूच्या लोकांनी आवाज दिल्यावर रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली. फरफटत गेल्याने वाहकाच्या पायाला खरचटून जखम झाली होती.

गुरव यांच्या सोबत बस मध्ये एकूण ५६ प्रवासी होते. प्रवाश्यांचा खोळंबा होत असल्याने गुरव यांना दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात आले. व बसचालक काळकुटे यांनी प्रवाश्यांना सोडून नंतर वाहक गुरव व बसचालक काळकुटे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.

महत्वाच्या बातम्या