तालिबानने भारताबद्दल पहिल्यांदाच केली भूमिका स्पष्ट

तालिबानने भारताबद्दल पहिल्यांदाच केली भूमिका स्पष्ट

TALIBAN

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जानंतर त्याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत आहेत. त्यातच आता तालिबान्यांनी भारताबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानेकझाई यांनी भारताबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

तालिबानला भारतासोबत अफगाणिस्तानचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध पूर्वीप्रमाणेच टिकून ठेवायचे आहेत. असे म्हटले आहे. याबाबत तालिबानने पहिल्यांदाच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच स्टानेकझाई यांनी समाज माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याची तालिबानची योजना आणि अफगाणिस्तानमधील शरिया आधारित इस्लामिक शासन याविषयी स्टानेकझाई यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान तालिबानने पाकिस्तानच्या माध्यमातून भारतासोबत व्यापार करणे अधिक सोयीस्कर असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांना त्यांच्या देशातून माल पाठवण्याची परवानगी दिली आहे. त्यातच आता तालिबान भारतासोबत पूर्वीसारखे संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या