सगळयांना निरामय आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी मागणी -अनुराधा पुराणिक

anuradha

औरंगाबाद : कोराना संसर्गामुळे गेल्या दीड -दोन वर्षांपासून विविध अनुभव, जगण्यासाठी जो लढा आपण देत आहोत. ही परिस्थिती लवकरच दूर व्हावी. तसेच गणेशात्सवाच्या पावन प्रसंगी ‘सगळयांना निरामय आयुष्य अन आरोग्य लाभो असे बाप्पांकडे मागणं असल्याचं ‘ओंजळ’ च्या संस्थापिका अनुराधा पुराणिक यांनी व्यक्त केले.

सध्या सर्वत्र महामारीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. शिवाय अनेकांना घरातील मंडळी गमवल्याचं दु:ख ही आहे. तसेच समाजात अनेक अप्रिय घटना ही घडत आहेत. या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं सशक्त माध्यम म्हणून प्रचलित असलेल्या महाराष्ट्र देशा या माध्यमाची भरभरून प्रगती व्हावी’, असे ही पुराणिक यांनी व्यक्त केले. त्या शहरात २०१३ पासून ‘ओंजळ’च्या माध्यमाने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहेत.

गणपती बाप्पा हा कला गुण, बुध्दीचा अधिष्ठाता आहे. आणि महिलांच्या कलागुणांना वाव आणि महिलांना आमंत्रित केले. तसेच दहा दिवस विविध स्तरातील ‘महिलांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती’ हा स्तुत्य उपक्रम राबविले याबद्दल सर्व महिलांवर्गाकडून ‘महाराष्ट्र देशा’चे आभार मानते’ असे ही व्यक्त केले. यावेळी छाया देवराज, शुभांगी कुलकर्णी , अग्रणी पुराणिक यांची उपसिस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या