‘तिसऱ्या आघाडीचा हा आरंभ, ही मोहीम संपूर्ण देश ढवळून काढेल’- शत्रुघ्न सिन्हा

shatrughn sinha

मुंबई : भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक नसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे. तिसऱ्या आघाडीचा हा आरंभ सुरू झाला आहे.

यात अजून लोक जोडल्या जातील. ही मोहीम संपूर्ण देश ढवळून काढेल, असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. ‘देशातील सर्वात मोठे राजकीय चाणक्य शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्वजण एकत्र येत आहेत. सर्वांची एकजूट होणं ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. आज सुरुवात झालीय. यापुढे आणखी लोक यात समील होतील,’ असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, 2018 मध्ये भाजपशी बिनसल्यानंतर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी हा मंच स्थापन केला होता. अनेक विरोधी पक्षांचे नेते या मंचात सामील झाले होते. समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, जेडीयूचे माजी खासदार पवन वर्मा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या राष्ट्रीय मंचचे सदस्य आहेत. काँग्रेसचे मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा हे दोन नेते देखील मंचाचे सदस्य आहेत.

महत्वाच्या बातम्या