fbpx

देवा तुझ्या उत्सवाचे चांगभल होऊ दे..

प्राप्त काळीच्या सुर्याची

प्रभा दिसे सोनेरी

चारी बाजूने निर्सगाची आहे मुक्त उधाळण

धनवान,गुणवान गाजे पंचक्रोशीत नाव

असे आहे सर्वांग सुंदर उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यात जोतिबावाडी हे गाव. बालाघाटच्या डोंगर रांगेवर वसलेले चार हजार लोकसंख्या असलेले गाव. जोतिबाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भुमी. जोतिबाचे भव्य दिव्य मंदिर गावामध्ये असल्याने गावाची ओळख जोतिबाचीवाडी म्हणून झाली. सध्या च्या आधुनिक काळात मोठ्या मोठ्या मंदिराची जागा निवासी इमारतींनी घेतली आहे. परंतु जोतिबाचीवाडी मधील ग्रामदैवतेचे मंदिर त्यातील उत्सव मात्र दरवर्षी वेगळ्या पद्धतीने व वेगळ्या स्वरूपात वाढत आहेत विशेष जग किती बदलले तरी गावातील परंपरा व ग्रामदेवता आणि त्या ठिकाणी होणारे विविध पारंपारिक धार्मिक उत्सव कार्यक्रम गावातील लोक तितक्याच आस्थेने व मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात गावातील पुरातन मंदिराच्या जागी तब्बल १कोटी लोक वर्गणीतून भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे

चैत्र महिन्यात जोतिबाची यात्रा असे तेव्हा भक्तांची अलोट गर्दी लोटते भक्तीमय आणि आनंदीमय वातावरणात यात्रा पार पडते. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जोतिबाच्या पालखी निघाल्या नंतर त्या पालखी सोबत असलेल्या सासन काट्या गुलाल खोबऱ्याच्या उधाळणामध्ये त्या गुलालाच्या लाल रंगात लोक आनंदाने रंगुन जातात यात्रे रम्य देखावा पाहून मन प्रफुल्लित होते या सर्व उत्सवातुन गावातील एकोपा समोर येतो वारकरी संप्रादायचा वारसा लाभलेल्या या गावी वर्षातून  तिनदा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते..जोतिबावाडीचे वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये मांसाहार केला जात नाही.गावामध्ये कोंबडी आणि तिचे आंडे तुम्हाला चुकुनही सापडणार नाही अंधश्रद्धेला बळी न पडता येथे प्राण्याचा बळी दिला जात नाही ही आनंदी बाब आहे.

माझ्या जोतिबा मंदिरी जळतात तेला तुपाच्या वाती…

येथे नित्य जपली जातात माणुसकीची नाती..

(जोतिबाचीवाडी) सालाबादाप्रमाणे या वर्षी ही जोतिबा दरबारामध्ये तिसरा श्रावण रविवार भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे भूम तालुक्यातील  कानाकोपऱ्यातुन भाविक जोतीबा च्या दर्शनासाठी येतात ही आपल्या साठी आनंदाची बाब आहे. बालाघाटच्या डोंगर रांगाच्या कुशीत वसलेले आपले विलोभनीय जोतिबा मंदिर आपल्या सर्वांनचे श्रद्धास्थान आहे…सभोवतालच्या श्रावणातील हिरवळ आणि व्रक्ष सर्वांनचे लक्ष्य वेधून घेतात..

कोल्हापूर च्या जोतीबा चे ठाण म्हणून आपल्या जोतिबाला ओळखले जाते…चैत्र महिन्याच्या यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव म्हणून आपण श्रावणातील रविवार साजरा करतो…गेली अनेक वर्षापासून हा श्रावण रविवार साजरा होत आहे… काळानुसार त्याचे स्वारूप ही बदलत आहे सुरुवात घरातून भाकरी आणत आणि त्याचा स्वाद घेत आत्ता मोठ्या महा प्रसादाचे आयोजन असते आनंदी बाब आहे… भक्ती भावाने सर्वच गावकरी या आनंदी सोहळ्यात सामिल होतात…किर्तना मधून येथे विचारांची  अलौकिक मांदीयाळी मिळते…गरिबी श्रीमंतीचा जातीपातीचा येथे भेदभाव नसतो फक्त जपली जाते ती माणूसकी…आज ही गावातील अनेक मंडळी व्यवसाय नोकरी च्या निमित्ताने गावी नसतात पण गावातील मातीशी त्यांची आपुलकीची नाळमात्र जोडलेली असते…त्या मुळे वेळ काढून या उत्सवासाठी सर्व गावकरी एकत्र येतात ही म्हत्वाची बाब.

(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही)

लेखक – लक्ष्मण जाधव