fbpx

…हि तर समांतर कंत्राटदाराची मनमानी-राजेंद्र दाते पाटील

rajendra date patil

राजू म्हस्के / औरंगाबाद-  सर्व सामान्य नागरीकाना वेठीस धरून मनमानी पाणी पट्टी आकारणाऱ्या समांतर कंत्राटदारास रोखणे गरजेचे आहे नाहीतर हजारोची पाणी पट्टी सर्व सामान्य नागरीकासाठी ओझं होईल, असे प्रतिपादन समांतर जल वाहिनीचे अभ्यासक राजेद्र दाते पाटील यांनी केले. फक्त ५.७७ टक्के काम करूनही आठशे कोटीचा दावा न्यायालयात करणे म्हणजे कंत्राटदाराची मनमानीच आहे.

राजेंद्र दाते पाटील यांनी २०१५ साली कंत्राटदार कंपनी सोबत करारनामा रद्द करणे बाबत मुद्देसुद निवेदन तात्कालीन आयुक्त सुनिल केंद्रेकर तथा राज्य शासनाने नियुक्त केलेल्या संतोष कुमार यांना दिले होते त्यामुळे जनहिताचा विचार करता सदरचा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याचे आवश्यक काम मनपा प्रशासनाने केले आहे. मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास महानगर पालिका कडे आजही ४९० कोटी ४८ लाखा पेक्षा जास्त निधी आहे मग ७९२ कोटीच्या प्रकल्पासाठी ३३०० कोटी पेक्षा जास्त पैसे जनतेने का फेडायचे . सिडको कडून साधारणत: १०० कोटी रुपये मदत म्हणून या योजनेसाठी मिळणार आहे. म्हणजेच ५९०.४८ कोटी एवढी रक्कम निव्वळ उपलब्धच आहे.

जनतेच्या हिताशिवाय काहीच नाही ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्याची राहील म्हणुन शासनाने आता हा पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उपलब्ध निधी खर्च करण्याची तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी समांतर जल वाहिनीचे अभ्यासक राजेद्र दाते पाटील यांनी केली आहे.