‘हे खूप गंभीर आहे, नथुराम गोडसे परत आले आहेत’ – जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामागे संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत हुबळी पोलिसांत तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास राहुल गांधींचे विमान अचानक एका बाजूला झुकले आणि वेगात खाली येऊ लागले.

Loading...

खाली येतानाच ते वेगात हालू लागले, अशी तक्रार हुबळी धारवाड पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याची माहिती राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कौशल विद्यार्थी यांनी दिली. या संदर्भात राज्य पोलिस महानिरिक्षक नीलमणि.एन.राजू यांना पत्र पाठवले असल्याचे कौशल यांनी सांगितले.

या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी ‘हे खूप गंभीर आहे. नथुराम गोडसे परत आले आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या विमानात झालेल्या बिघाडामागे घातपात असल्याचा संशय आव्हाड यांनी व्यक्त केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी ट्विटसोबत राहुल गांधी यांनी पोलिस महानिरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीचे फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी हे प्रकरण म्हणजे नथुराम गोडसेने महात्मा गांधींची केलेली हत्ये सारखेच असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.Loading…


Loading…

Loading...