“हा मोहम्मद पैगंबरांचा मार्ग नाही” :मोहम्मद कैफ

वेबटीम : फेसबुकवरील एका पोस्टमुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये मोठं वादंग सुरू आहे .या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू मोहमद कैफने दंगेखोरांना चांगलच सुनावलं असून दंगेखोरांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबरांचा अपमान केला, असा आरोप करत पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा इथे दंगेखोरांनी मोठा  उत्पात माजवला आहे. ठिकठिणाणी जाळपोळ, लोकांना मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्याला आग देखील लावण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ प्रचंड संतापला आहे. त्याने ट्विटरवर त्याचा संताप व्यक्त केला आहे

संताप व्यक्त करताना कैफ म्हणतो

“पैगंबर मोहम्मद हे इतके महान आहेत की त्यांचा अपमान करणाऱ्या फेसबुक पोस्टच्या विरोधात बचावासाठी कोणालाही येण्याची गरज नाहीये. कोट्यवधी रूपयांची संपत्ती जाळून खाक करणे, त्याची मोडतोड करणं हे मोहम्मद पैगंबरांनी दाखवलेल्या मार्गाच्या विरूद्ध आहे.”

कैफचं हे ट्विट जबरदस्त वाचलं जातंय, आत्तापर्यंत अडीज हजारापेक्षा जास्त जणांनी हे रिट्वीट केलं. यातील बहुतांश जणांनी कैफचं कौतुक केलं, तर काहींनी चिंता व्यक्त केलीय की त्याच्या या विधानामुळे त्याच्याविरूद्ध फतवा निघेल.