हि काही देशातील पहिलीच दुर्घटना नाही; गोरखपूर रुग्णालयातील मृत्यूवर अमित शहांचे विधान

गोरखपूरमधील रूग्णालयात हलगर्जी पणामुळे सत्तर पेक्षा जास्त बळी गेल्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात असताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत, गोरखपूरमधील रूग्णालयात घडलेले मृत्यू ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे.

bagdure

गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात ऑक्सिजन अभावी ७० पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात जन्माष्टमी कशी काय साजरी होऊ शकते असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अमित शहा यांनी उत्तर हे वादग्रस्त विधान केल आहे

काय म्हटल आहे अमित शहा यांनी ?
भारतासारख्या मोठ्या देशात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत, गोरखपूरमधील रूग्णालयात घडलेले मृत्यू ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही . राजीनामे मागणं काँग्रेसचं काम आहे त्याप्रमाणे ते मागत आहेत . जन्माष्टमीचा उत्सव आपल्या जागी आहे तो देशात साजरा होतो आहे तसाच उत्तरप्रदेशातही साजरा होतो आहे, जन्माष्टमी साजरी करावी ही लोकांची धारणा आहे त्यामागे सरकारचं काहीही धोरण नाही असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...