ही आपली शेवटची निवडणूक – सिद्धरामय्या

बंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी १२ मेला मतदान झाले. उद्या या निवडणुकीचा निकाल आहे. कॉंग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान कर्नाटकात पुन्हा एकदा काँग्रेसचं बाजी मारेल असं सांगत, ही आपली शेवटची निवडणूक असून, यानंतर आपण निवडणूक लढवणार नसल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हण्टलं.

चामुंडेश्वरी या आपल्या मतदारसंघात पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युतीची गरज काँग्रेसला भासणार नाही असे स्पष्ट केले. तसेच राज्यात दलित मुख्यमंत्री निवडण्याची कल्पना चांगली आहे. मात्र याबाबत पक्षच निर्णय घेईल असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे भाकीत वर्तवले आहे. त्याबाबत विचारले असता, या जनमत चाचण्यांना दोन दिवसांचे करमणूकमूल्य आहे अशा शब्दांत खिल्ली उडविली.

संख्यातज्ज्ञांवर फार विश्वास ठेवू नका, हे सांगताना त्यांनी एखाद्या व्यक्तीला नदी सरासरी चार फूट खोल आहे म्हणून त्यात उडी घे असा सल्ला देण्यासारखे आहे. ती नदी काही ठिकाणी सहा फूटही खोल असू शकते. त्यामुळे ही व्यक्ती बुडू शकते. त्यामुळे अशा तज्ज्ञांवर किती भरवसा ठेवणार असा प्रश्न त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, सुटीचा आनंद घ्या, काँग्रेसचे सरकार पुन्हा येणार आहे अशी ट्विप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

2 Comments

Click here to post a comment
Loading...