‘..हा तर मुंबईचे अहमदाबाद करण्याचा डाव!’, विमानतळ मुख्यालय हलवल्याने शिवसेना संतप्त

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे.

अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

यावरून शिवसेना संतप्त झाली आहे. शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले की, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचं महत्व वाढवा. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP