हा लोकशाही आणि कर्नाटकच्या जनतेचा पराभव : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं असून, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना अपयश आले आहे त्यावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून स्वार्थी हेतूसाठी बाहेरुन आणि आतून निशाण्यावर होतं. जे लोक या आघाडीच्या सत्तेला एक धोका आणि अडथळ्याच्या रुपात पाहत होते, त्यांच्या लालसेचा आज विजय झाला. हा लोकशाही, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकच्या जनतेचा पराभव आहे. अशा आशयाच ट्वीट केले आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी भाजपने काँग्रेस आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून व पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. ही लोकशाहीची गळचेपी असून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करून भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे, असे म्हंटले आहे.