मुंबई : नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण २१ जागांपैकी १७ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला तर काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीच्या आधीच आधीच १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर ७ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत प्रदीप कंद यांची संचालकपदी निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत प्रदीप कंद यांची संचालकपदी निवड झाली. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. ही तर सुरुवात आहे, भविष्यात त्यांची कामगिरी अजून चांगली असेल. या वेळी भोसरीचे आ. महेश लांडगे, दौंडचे आ. राहुल कुल सोबत होते. pic.twitter.com/3T8VhakSpy
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 25, 2022
याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत प्रदीप कंद यांची संचालकपदी निवड झाली. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. ही तर सुरुवात आहे, भविष्यात त्यांची कामगिरी अजून चांगली असेल. या वेळी भोसरीचे आ. महेश लांडगे, दौंडचे आ. राहुल कुल सोबत होते.’
‘या कार्यक्रमास भाजपा प. महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जि. प. सदस्या आशाताई बुचके, पुणे मनपा सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह मान्यवर आणि पुणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारीही उपस्थित होते.’ अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या