ये तो सिर्फ प्रॅक्टिस है , रिअल अभी बाकी है ; मोदींचा पाकिस्तानला इशारा

modi ji

टीम महाराष्ट्र देशा : देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भारत पाकिस्तान सबंध दिवसेंदिवस तणावग्रस्त होत आहेत. दोन्ही देशांमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर छोटी युद्ध होत आहेत. तर भारताने पाकिस्तानला चहुबाजूने गोचीत आणले आहे. आज मोदी यांनी सध्या नुसती प्रॅक्टिस सुरु आहे, रिअल अजून बाकी आहे, असा इशारा दिला आहे. ते नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटचालीवरही भाष्य केले.

यावेळी मोदी यांनी भाषणाची सुरवात पाकिस्तानला अप्रत्यक्ष रित्या इशारा देत केली. मोदी म्हणाले की, सध्या नुसती प्रॅक्टिस सुरु आहे, रिअल अजून बाकी आहे. या वाक्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडात झाला. सध्या देश युद्ध करण्याच्या मानसिकतेतून जात आहे. त्यामुळे देशाच्या प्रमुखाकडून येणारे प्रत्येक शब्द हा देशवासीयांसाठी उभारी आणि धैर्य देणारा आहे. त्यामुळे मोदींचे हे शब्द सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सर्व काही सांगून जातात.

विज्ञानावर बोलताना मोदी म्हणाले की , विज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलांप्रमाणे आपल्या संस्थांना भविष्यातील गरजेनुसार बदलावं लागेल. आपल्या मुलभूत ताकद निर्माण करत असतानाच, भविष्यातील समाज आणि आर्थिक गोष्टींनुसार वाटचाल करावी लागेल. तसेच भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे,