हा तर धनंजयवर अन्याय! शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. धनंजय मुंडे यांच्यासाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सोशलमिडीयावर मुंडेनी राष्ट्रवादीची एक जागा घालवली म्हणून चर्चा सुरु होती.

शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यानी म्हटले म्हणून आम्ही कराडांना उमेदवारी दिली हे साफ खोटे असून धनंजय मुंडेंचे मत वेगळे होते. तसेच कराडांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी कोणताही हट्ट केला नाही. सोशल मिडियात जे येतय तो त्यांच्यावर अन्याय आहे, असे पवारसाहेब म्हणाले.

आर्थिक ताकद नसल्याने कराडांनी अर्ज मागे घेतला

रमेश कराड यांनी लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत. राष्ट्रवादीला बुचकाळ्यात पाडले होते. शरद पवार म्हणाले, तीन जिल्ह्यात निवडणूक असल्याने निवडणुकीपूर्वी तेथे पोहोचता येईल म्हणून थोडेसे धाडस म्हणून आम्ही आम्ही ती जागा घेतली. आर्थिक ताकद नसल्याने मी लढू शकत नाही, असे सांगत कराडांनी अर्ज मागे घेतला. असं शरद पवार म्हणाले.

Gadgil