‘ २० वर्षातील हे भारताचे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण’, मॅक्युलमने केले कौतुक

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

या सामन्याच्या पार्श्वभूमिवर न्युझीलंडचा माजी दिग्गज खेळाडु ब्रेंडन मॅक्युलमने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासात फारच कमी वेगवान गोलंदाज होउन गेले. त्यात कपील देव, जवागल श्रीनाथ, झहिर खान हे त्यापैकी काही गोलंदाज. मात्र आताच्या भारतीय संघातील गोलंदाजी आक्रमण हे मागील २० वर्षतील सर्वोत्तम आक्रमण आहे. तर वेगवान गोलंदाजाच्या जोडीला आर अश्विन आणि रविंद्र जडेजा सारखे फिरकीपटु साथ देतात.’ असे म्हणाला.

यावेळी त्याने डब्ल्युटीसी अंतिम सामन्यातील सहभागी दोन्ही संघाचे कौतुक करताना दोन्ही संघ कमालीचे मजबुत आहे. असे म्हणाला आहे. डब्ल्युटीसी सामन्यातील भारतीय संघात इंशात शर्मा , जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्या जोडीला मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर सारखे युवा गोलंदाज आहे. डब्ल्युटीसी सामन्यासाठी १० दिवसापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP