अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडला नाव, ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद बाब : विराट कोहली

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानाचे नामकरण करण्यात आले आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव या मैदानाला देण्यात आले आहे. तसेच या मैदानाच्या एका स्टँडला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडीयमच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये हा नामकरण विधी पार पडला.

या स्टेडियमच्या एका स्टँडला विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. याविषयी बोल्याना विराट कोहली यांनी मी आयोजकांचे खूप आभार मानतो. अमित शाह, संपूर्ण क्रिकेट संघ, माजी क्रिकेटर, माझी पत्नी, माझा भाऊ, माझे प्रशिक्षक मी या सर्वांचे खूप आभार मानतो. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही वेळ खूप अभिमानास्पद आहे. असं विधान केले आहे.

दरम्यान, या मैदानाचे नामकरण भारताचे माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या नावावर झाले आहे. अरुण जेटली यांनी दिल्ली क्रिकेटसाठी महत्वाचे योगदान दिले आहे. ते १९९९ ते २०१३ दरम्यान दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी क्रिकेटला आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा पुरवल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दाखल घेत फिरोज शाह कोटला ऐवजी अजून जेटली यांचे नाव या मैदानाला देण्यात आले आहे.