अजित पवारांविरोधात शिवसेनेकडून ‘हा’ नेता उतरणार मैदानात

बारामती : संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात शिवसेनेनी तयारी सुरु केली आहे. २०१४ विधानसभा निवडणूकीत यूती तूटल्याने महाराष्ट्रभर भाजपा -शिवसेना वेगवेगळी लढल्याने बारामतीमध्ये धनगर आरक्षणाच्या भूमिकेवर भाजपाचे बाळासाहेब गावडे यांना ६० हजार मते मिळाली, र शिवसेनेचे उमेदवार अँड राजेंद्र काळे यांना ४ हजार अल्प मते मिळाली होती. त्यामुळे यूती झाली नाही झाली शिवसेना बारामतीमध्ये लढणार आहे.

पवार कुठुंबियाकडे बारामतीची ५० वर्ष एकहाती सत्ता असूनही बारामतीतील ४२ गावातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत सोडवू शकले नाहीत या कारणास्तव विशेषता जिरायती भागातील जनता लोकप्रतिनिधीवर नाराज आहेत. माञ केवळ निवडणूकीपुरताच जिरायती भागातील समस्यांवर चर्चा होत आहे.

यावेळी शिवसेना जिरायती भागातील उमेदवारी देऊन बारामतीच्या जिरायती भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेती सिंचनाचा, रोजगारासारख्या विविध प्रश्नावर लक्ष वेधत शिवसेना जिरायती भागात उमेदवारी देण्याच्या सपष्ट भुमिकेत आहे. विविध प्रश्नावर आंदोलने, प्रशासनावर पकड असणारा बारामती विधानसभा निवडणूकीमध्येजिरायती भागातील तरुण चेहरा दिलीप नाळे या नावाची चाचपणी सध्या शिवसेनेकडून सूरु आहे.

अजित पवारांचे परंपरागत विरोधक असलेले चंद्रराव तावरे, पोपट तूपे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, राजेंद्र काळे या सर्वांनी यापुर्वी अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढविली असून निष्ठावंत चेह-याला उमेदवारी देण्याचे शिवसेनेची आग्रही भूमिका सपष्ट आहे.

होतकरु व प्रामाणिक तरुण नेतृत्वास निवडणूक लढण्याची संधी मिळावी अशा प्रतिक्रीया समाजातून येत असताना दिलीप नाळे यांचासारख्या अभ्यासू होतकरु शिवसैनिकास बारामती विधानसभा निवडणूकीत उमेदवारी देत बारामती विधानभा निवडणूक लश्यवेदी ठरविण्यासाठी वरिष्ठ शिवसेना नेत्यांकडून सपष्ट संकेत मिळत आहे.