हा तर कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

pruthviraj chavan

मुंबई : गेल्या सहा वर्षांत भाजप सरकारने कृषीव्यवस्थेचं वाटोळं केलं आहे. कृषी व्यवस्था घाईगडबडीत भांडवलदार मित्रांकडे बहाल करण्याचा डाव मांडण्यात येत आहे. कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. केंद्र सरकारने नवं कृषी विधेयक नुकतंच मंजूर केलं. याविरोधात आयोजित एका व्हर्चुअल सभेत चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“गेल्या अनेक वर्षांत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताची कृषी यंत्रणा उभी केली होती. ती संपूर्ण यंत्रणा मागच्या सहा वर्षांत मोदी सरकारने मोडीत काढली. सर्व क्षेत्रात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे,”असं चव्हाण म्हणाले.

दरम्यान, काँग्रसने शेतकरी, कामगार यांच्यासाठी हक्काचे कायदे केले होते. परंतु आता ते कायदे रद्द करून शेतकरी व कामगार यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कायद्याचे दुरगामी परिणाम होणार आहेत. हे कायदे कामगार, शेतकऱ्याच्या हितासाठी नाहीत. अस मत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

तर या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा पेटून उठला आहे. या कायद्यामुळे काँग्रेसने उभी केलेली बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांना मोकळे रान मिळणार आहे.

काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कामगारांसाठी लढत आहे. आपणही पेटून उठले पाहिजे अन्यथा पुढचे दिवस चांगले नाहीत. शेतकरी, कामगारांच्या हितासाठी हा एल्गार सुरु केला असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-