‘हे तर संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांच्या तत्वांचे उल्लंघन’

‘हे तर संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांच्या तत्वांचे उल्लंघन’

modi vs owesi

नवी दिल्ली : काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नवी दिल्लीतील संसदेच्या नवीन वास्तू असलेल्या व्हिस्टा प्रकल्पाला भेट दिली. तेथील कामाचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. या भेटीची कुठलीही घोषणा न करता त्यांनी प्रकल्पाचे ठिकाण गाठले होते. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा पंतप्रधान मोदींचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाच्या कामात कुठलीही हयगय होवू नये या दृष्टीकोनातून ते कामावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान मोदींच्या या भेटीचं एकीकडे कौतुक होत असतानाच खासदार असुदुद्दीन औवेसींनी साईटवरील भेटीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ‘खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी, संसद हे पंतप्रधान कार्यालयाचे डोमेन नाही. लोकसभा अध्यक्षांशिवाय हे येथे आलेच कसे? लोकसभा अध्यक्षांनी मोदींना परवानगी दिली होती का? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांच्या तत्वांचे हे उल्लंघन आहे,’ असेही औवेसी यांनी म्हटले आहे.

सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाचे अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन केले. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही परिधान केले होते. सध्या सोशल मीडियावर मोदींच्या या साईट भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, अनेकांनी त्यांना ट्रोलही देखील केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या