कर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उपाय; कोट्यावधी खर्च करून गोशाळा बांधणार : महादेव जानकर

महादेव जानकर

नाशिक : कर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी गोमुत्र प्यावे असा सल्ला महादेव जाणकरांनी दिला आहे. त्याचबरोबर यासंदर्भात राज्य शासन कोट्यावधींचा खर्च करुन राज्यभर गोशाळा सुरु करण्याची योजना आणणार आहे असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सिन्नर येथे बोलताना सांगितले. महादेव जानकर आज नाशिकच्या दौ-यावर होते. त्यांनी त्र्यंबकेश्वर तसेच सिन्नरला मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले.

यावेळी त्यांनी धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र आली तर राज्याचेल चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही असे सांगितले. ते म्हणाले, ‘गोमुत्राचे अनेक फायदे आहेत. त्याने कर्करोग दुर ठेवता त्यामुळे राज्यभर गोशाळा उभारण्यास प्रोत्साहन दिले जाईल. त्याला मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाईल’.

शासनाच्या या खात्याच्या विविध योजना संबंधितां पर्यंत पोहचत नाही व कर्मचारी त्या बाबत उदासीन असतात.सध्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास खाते उत्पन्न मिळवु लागले आहे अन्यथा ते कर्मचाऱ्यांच्या पुरतेच सिमीत होते, असेही जानकर म्हणाले.