‘ज्या लोकांमध्ये वाढलो, वावरलो त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची ही खरी संधी आहे’

मुंबई : ‘मी स्वतः ऊसतोड कुटुंबातील आहे. ज्या लोकांमध्ये वाढलो, वावरलो त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची ही खरी संधी आहे.’ अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची सूत्रे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून आता सामाजिक न्याय विभागाला सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे हे महामंडळ आता धनंजय मुंडे यांच्याकडे आले आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. आता या मंडळाची जबाबदारी मुंडे यांच्याकडे आल्याने त्यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading...

राज्यात ८ लाखांहून अधिक ऊसतोड कामगार आहेत, त्यातील बहुतांश हे बीड जिल्ह्यातील आहेत. असंघटित व असुरक्षित असलेल्या या वर्गाला सामाजिक प्रवाहासह सुरक्षा, आर्थिक उन्नती साधण्याचे मोठे आव्हान असून, अत्यंत आनंदाने आपण ते स्वीकारत आहोत. मी स्वतः ऊसतोड कुटुंबातील आहे. ज्या लोकांमध्ये वाढलो, वावरलो त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची ही खरी संधी आहे.अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये हे महामंडळ गठीत करण्यात आले होते, विरोधी पक्षात असतानाही धनंजय मुंडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्योग, कामगार व ऊर्जा विभागाकडून या महामंडळाची जबाबदारी आपल्या विभागाकडे सोपविण्यात यावी अशी विनंती धनंजय मुंडे यांनी सरकारकडे केली होती. त्यानुसार सोमवारी (ता. २४) रोजी शासन निर्णय निर्गमित करण्कयात आला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश