हा तर पब्लिसीटी स्टंट ! 5G प्रकरणी जुही चावलाला कोर्टाने ठोठावला २० लाखांचा दंड

juhi chawala

मुंबई : भारतात 5G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने थेट भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आता या प्रकरणी अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड झाला आहे. कायद्याचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत तिला हा दंड दिल्ली हायकोर्टाकडून करण्यात आला आहे. कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीची लिंक जुहीने सोशल मीडियात टाकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी तिने ही याचिका दाखल केल्याचं कोर्टाने म्हटलंय.

तिने ही लिंक सोशल मिडीयात शेअर केल्यामुळे ऑनलाईन सुनावणीत एका चाहत्याने येऊन तिची गाणी म्हणण्याचा आचरट प्रकार घडला होता. कोर्टाच्या कामात अडथळा आणला होता. या प्रकरणी आता जुही चावलालाच 20 लाखांचा दंड कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. देशात 5 जी तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं त्यामुळे त्यावर स्थगिती लावाली, अशी याचिका जुही चावलाने केली होती.

कोर्टानं म्हटलं आहे की, फिर्यादीनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला. यामुळं फिर्यादीवर 20 लाख रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. हे प्रसिद्धीसाठी होतं असंही दिसतंय. जुही चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीचा लिंक प्रसारित केली, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे आर मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची वेब लिंक प्रसारित केली. हे लक्षात घेता प्रसिद्धीसाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP