‘हा तर जोक ऑफ द डे झाला’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

chitra wagh

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणावरून भाजपवर सामनातून निशाना साधला आहे. दरम्यान यावरच भाजपच्या चित्रा वाघ यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

राज्यातल्या महिलांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आणण्याच्या तुम्ही गप्पा मारता, मात्र तो नुस्त नावापुरता राहिला आहे. एफआयआर होत नाहीत त्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं आहे. आज बलात्कारीच म्हणतायत आम्ही बलात्काऱ्यांना सोडणार नाहीत. हा तर जोक ऑफ द डे झाला. तुमची दुटप्पी भूमिका चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची दखल भाजपा घेणार आहे. अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी साकीनाक्यासारखी प्रकरणे ही एका भयानक विकृतीतून घडत असतात. व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. ती सर्वस्वी चुकीची आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणार्यांना राजाश्रय होता व आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारने घाईघाईने जाळून पुरावाच नष्ट केला व तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिले जात नव्हते. अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. तर यावरच चित्रा वाघ यांनी शातील बलात्काराच्या इतर घटनांबद्दल आम्हाला संवेदना असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :