हा तर भगवंतालाही फसवणारा अर्थसंकल्प : आचार्य तुषार भोसले

tushar bhosale

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. भाजपच्या विविध नेते यावर भाष्य करत आहेत. भाजपाचे आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. यामध्ये ते म्हणाले कि, ‘ठाकरे सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा पूर्णपणे भगवंतालाही फसवणारा अर्थसंकल्प आहे. खरतर मानमीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते कि प्राचीन मंदीराच संवर्धन करण्याकरता आम्ही योजना आणतो. आणि आजच्या अर्थसंकल्पातील योजना पहिली तर राज्यातल्या फक्त आठ मंदीराच संवर्धन होणार आहे, म्हणजे काय तर  ”खोदा पहाड आणि निकला चुहा” अशी गम्मत आहे.

फक्त आठ मंदिराच संवर्धन आणि त्याच्यासाठी सुद्धा १०१ कोटी रुपयाची तरतूद म्हणजे देवाच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचाराच पुरण तयार करून ठेवण्याची व्यवस्था झाली आहे. संत नामदेव महाराजाच्या ७५० व्या जयंती वर्षाचा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित केला, पण अस असताना सुद्धा महाराजांच्या नावे कोणतीही योजना नाही, कोणताही पुरस्कार नाही, सरकारी कार्यक्रम नाही, पंढरपूरच्या संत पिठाचा विषय नाही. कोणत्याही तीर्थक्षेत्राला निधी नाही अध्यात्मिक क्षेत्रात फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे.’ अशा भावना त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :