कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देशातील हा उद्योग समूह खर्च करणार १०० कोटी

blank

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार लॉक डाऊनमुळे ठप्प आहेत. या सर्वाचा आर्थिक फटका मोठा असून यासाठी मोठ्या मदतीची आणि निधीची गरज लागणार आहे. आता समाजातील दानशूर व्यक्ती समोर येऊन मदत करत आहे.

देशात संवेदनशील उद्योग घराणं म्हणून परिचित असलेला बजाज उद्योग समूह कोरोना विरुद्धच्या या लढ्यात १०० कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती समूहाचे राहुल बजाज यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. हा निधी बजाज समूहाशी निगडीत २०० पेक्षा जास्त स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमांतून खर्च करण्यात येणार आहे.

या निधीतून  पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील सरकारी आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये  सुधार करण्यासाठी तसेच अधिकाधिक व्हेंन्टीलेटर आणि इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या अन्न, निवारा , आरोग्य आणि स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी प्रयत्न करण्यात येणार आहेत अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

तसेच ग्रामीण भागात एक फंड स्थापन करून ग्रामीण भागात उपजीविका निर्माण करण्याची संधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा तसेच तपसणी केंद्र यांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे, असही या पत्रकात म्हटलं आहे. तसेच कोरोना विरुद्ध प्रत्यक्ष लढाई लढणाऱ्या आरोग्य सैनिकांना बजाज समूहाकडून सलाम करण्यात आला आहे.

blank

 

 

हेही पहा –