ठाकरे-पवार व अधिकाऱ्यांमधील बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

uddhav thackrey

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत सात हजारांवर नवे रुग्ण झाले. मुंबई शहरातच हा आकडा हजाराच्या आसपास आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अन प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विरोधक यावरून सरकारवर निशाणा साधत आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी शिस्त पाळावी, मास्क वापरावा असं आवाहन केले आहे. पुढील ८ दिवस महत्त्वाचे आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, राज्यात अमरावती, अकोला, पुणे याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, मुंबईतही लोकलबाबत आणि संचारबंदीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

ही बैठक सुरु असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहचले होते. कोरोना संदर्भातली बैठक सुरू असताना शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले असतानाच चर्चांना उधान आले होते.

कोरोना संसर्ग हा पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. हे रोखण्यासाठी पुन्हा नव्याने नियमांचा प्रचार करण्याची गरज आहे लोकांना पुन्हा एकदा याचे गांभीर्य पटवून द्यावे लागेल. लोकांपर्यंत पुन्हा नव्याने माहिती पोहोचवावी लागेल. लोक नियम पाळतील याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल. लोकांना त्यांचं नुकसान काय आहे ते पटवून द्या,’ अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या आढावा बैठकीत केल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या