परदेशात वडापावच्या व्यवसायातून ‘हा’ तरुण कमावतो करोडो रुपये !

indian-vada-pav-stall-london-mumbai-street-food-shree-krishna-hounslow-harrow-lifefd

भारतीयांना परदेशी नोकरीचे प्रचंड आकर्षण आहे. परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळते. चांगली लाईफ स्टाईल जगता येते त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थीचा परदेशात नोकरीला जाण्याकडे ओढा असतो. परदेशात गेल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते पण अचानक काही कारणाने तिथली नोकरी जाते आणि अनेक तरुणांना पुन्हा आपल्या माय देशात परतावे लागते.

असाच एक भारतीय तरुण नोकरीसाठी परदेशात गेला, पण २००९ च्या आर्थिक मंदीत त्याला आपली नोकरी गमवावी लागली.पण भारतात परत न येता त्याने तिथेच वडा पाव विकण्याचा व्यवसाय सुरु केला आणि आज तो करोडो रुपये कमावत आहे.

सुजय सोहानी हे त्या तरुणाचे नाव आहे. लंडनमधल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करायचा. बेरोजगारीमुळे अनेक प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभे राहिले. त्यामुळे त्याने लंडनमध्ये स्वतःच व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.

मित्राच्या मदतीने त्याने व्यवसाय सुरु केला. मित्राच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि सहकार्यामुळे त्याने व्यवसायास सुरुवात करण्याचे ठरवले. हे दोघेही मुंबईचे. एकाच कॉलेजात शिकलेले. खाद्यपदार्थाचा व्यवसाय करण्याचे ठरवल्यानंतर नेमक्या कोणत्या व्यवसायाची विक्री करायची ? हा प्रश त्यांना पडला. मग वडापाव हा पदार्थ ठरला. ‘हफिंग्टन पोस्ट’ च्या वृत्तानुसार एका आईस्क्रीम पार्लरमध्ये भाड्याने जागा घेऊन सुबोध आणि सुजयने वडापावचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मोफत वडापाव देऊन ग्राहकांची मने जिंकली. हळूहळू उत्पन्न वाढू लागल्यानंतर या दोघांनीही पदार्थांची यादी वाढवत नेली. २०१० मध्ये त्यांनी ‘श्रीकृष्ण वडापाव’ नावचं भारतीय हॉटेल सुरु केलं.

वडापावसोबतच दाबेली, समोसा, भेळ, कचोरी, भजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस यासारख्या पदार्थांची देखील विक्री करायला सुरूवात केली. सात वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना आता या व्यवसायातून वर्षाकाठी ४ कोटींहून अधिक रुपयांचा फायदा होतो.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...