सोलापूर : सोलापूरमध्ये आज (३० एप्रिल) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तोपर्यंत हे सरकार चालत राहणार, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘ट्रान्सपोर्ट सबसिडी नसती दिली तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशातुन ट्रान्सपोर्ट आणि हारवेस्टिंगचे पैसे कापले जातात, म्हणजे ही शेतकऱ्यालाच मदत आहे. रिकव्हरी लॉस मधून २०० रुपये टनाला दिले तर शेतकऱ्याची रिकव्हरी जास्त राहणार आहे.’ तसेच या सगळ्यावर देखरेख ठेवायला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय कारखानदारांसाठी नसून शेतकऱ्यांसाठीच घेतलेला आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये,त्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ नये, यंदाचा ऊस यंदाच संपवा ही महाविकास आघाडी सरकारची या मागची भूमिका आहे, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतांना अजित पवार म्हणाले की,‘उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तोपर्यंत हे सरकार चालत राहणार, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 LSG vs PBKS : …अन् पुन्हा कृणाल पंड्या-दीपक हुडाचं भांडण होता होता राहिलं! पाहा VIDEO!
- “मविआ सरकारच्या नेत्यांनी मारलेल्या थापांच्या भुलभुलैयात फसलेल्या…”, चित्रा वाघ यांची टीका
- IPL 2022 : शुबमन गिलनं Swiggyला फटकारलं..! एलोन मस्ककडं केली ‘ही’ भन्नाट मागणी; वाचा तर!
- “लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या?”, फोटो पोस्ट करत मनीषा कायंदेंचा अमृता फडणविसांवर निशाणा
- IPL 2022 GT vs RCB : बलाढ्य गुजरातसमोर बंगळुरुचं आव्हान; डु प्लेसिसनं जिंकला टॉस!