हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होतं, मग अजून का केला नाही?

ramdas athwale

मुंबई : परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम लांबला आहे. येत्या १७ तारखेपर्यंत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करत सतर्कतेचा इशारा दिला असून १० ऑक्टोबरपासून अचानकपणे पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे.

हाताशी आलेला ऊस, सोयाबीन, भात आणि इतर पिक काही ठिकाणी आडवं झालं आहे तर अनेक शेतकऱ्यांचं पिकचं वाहून गेलं आहे. त्यामुळे आधीच कीड, ४ महिन्यातील अतिवृष्टी, कोरोनामुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, बोगस बियाणं यासारख्या प्रतिकूल परिस्थितींशी सामना करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं असून भविष्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे.

या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली असून ते मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधतील असं देखील सांगितलं जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून 15 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली आहे.

तर, काँग्रेस सध्या कृषी विधेयकास विरोध करत आहे. व्हर्च्युअल रॅली काढत आहेत, परंतु राज्यातील पिकांच्या नुकसान भरपाईला तयार नाही. तसेच हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होतं, मग अजून का केला नाही? असा सडेतोड सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या-