हे सरकार दलितांच्या हिताची भुमिका घेणारे-रामदास आठवले

ramdas aathvale

सांगली : गेल्या चार वर्षांत सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केले आहे. त्यामुळे सांगलीतही विकासाची ही गंगा पोहोचवण्यासाठी येत्या १ ऑगस्टला भाजप रिपाई युतीलाच मतदान करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी सांगलीकरांना केले आहे. खरे तर आपणास सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी येण्याची इच्छा होती, मात्र संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सांगली महापालिकेच्या प्रचारात सहभागी होता न आल्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला.

सांगली हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा जिल्हा आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांचा जिल्हा अशीही या जिल्ह्याची अोळख आहे. मात्र तरीही दुर्दैवाने सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरी भागाचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. महापालिकेत आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिका क्षेत्रातील सोयीसुविधांचा विकास करण्याऐवजी आपलाच स्वार्थ साधल्याचा आरोप मा. आठवले यांनी केला. याउलट राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने जीएसटी कर प्रणाली देशात पहिल्यांदाच लागू करत कररचनेत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. देशात सध्या तब्बल साडे सहा लाख कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत. महिलांना विनातारण कर्ज देण्याची योजना प्रधानमंत्री मोदींनी सुरू केली. या शिवाय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा धाडसी निर्णयही या सरकारने घेतला. अनेक बोगस कंपन्या बंद केल्याच, शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे प्रधानमंत्री मोदींचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराची एकही मोठी घटना घडली नाही, त्यामुळेच गोरगरिबांच्या विकासासाठी भाजप सरकारला पार्याय नसल्याचे ते म्हणाले.

या शिवाय हे सरकार हे दलितांच्या हिताची भुमिका घेणारे सरकार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मुंबईतील इंदू मील येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, नवी दिल्लीतील २६ अलीपुर रोड येथील स्मारक आणि लंडन येथील स्मारकाच्या कामालाही या सरकारने गती दिल्याचेही ते म्हणाले.

शहरातील पायाभूत सुविधा, रस्तेबांधणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुक, आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण यासारख्या विषयांवर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडे चांगले व्हिजन आहे. त्याचा वापर करून सांगली महापालिका क्षेत्राचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. केंद्रातील आणि राज्यातील विकासकामाचा धडाका सांगलीतही लावण्यासाठी भाजप आणि रिपाई सज्ज झाली असून येत्या १ ऑगस्ट रोजी भाजप आणि रिपाई युतीच्या उमेदवारांनाच मते द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

भाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेनेत उभी फूट पडेल – रामदास आठवले

पोलादपूर घाट दुर्घटना : कृषी राज्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव