हे सरकार सायलेंट मोडवर : राधाकृष्ण विखे पाटील

राज्य सरकारने तीन वर्षात फक्त निर्णय घेतला अंमलबजावणी मात्र ‘झिरो’: विखे पाटील

 टीम महाराष्ट देशा : सरकारने तीन वर्षात फक्त निर्णय घेतले, पण अंमलबजावणी दिसत नाही. सरकार ऑटो पायलट मोडवर निर्णय घेण्याचं म्हणत आहे, मात्र सरकार सायलेंट मोडवर गेलं आहे व निष्क्रिय देखील झाल असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्याबद्दल ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर सामाजिक सद्भाभाव टिकवण्यास सरकारला अपयश आलं आहे. त्याचाच उद्रेक भीमा-कोरेगावच्या आंदोलनात पहायला मिळाला. हा उद्रेक सरकार पुरस्कृत होता का, असा सवाल विखे पाटलांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...