‘हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करणारे’, आठवलेंचे टीकास्त्र

patil-athwale

मुंबई : भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तसेच त्यांच्यावर टीकास्त्रांचा प्रहारही होत असल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करणारे सरकार आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. तुम्ही एकत्र आला आहात तर तुम्ही शांतपणे राज्याचा कारभार करा. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. लोकांचे प्रश्न बाजूला राहिले आणि त्यांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्री मोदींकडे आहे. नरेंद्र मोदींवर काहीतरी आरोप करायचा आणि त्यातच आपलं समाधान मानतात. हे सरकार जावं आणि आमचे महायुतीचे सरकार यावे,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव येथे एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या