‘या’ महिला कुस्तीपटूने वडिलांसह केला भाजपमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पक्षाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. असे असताना राजकीय नेत्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरही भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर हरियाणाची कुस्तीपटू बबिता फोगाट आणि तिचे वडील महावीर फोगाट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्याने प्रेरीत झाल्याने त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केंद्रीय मंत्री किरण रीजीजू यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये  प्रवेश केला.

Loading...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर सिंग जननायक जनता पक्षाला पाठिंबा देत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जम्मू काश्मीर मधून कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने देश पुन्हा एक झाला आहे. त्यांच्या या निर्णयाला प्रेरित झाल्याने त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे. फोगाट यांना कुस्तीसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करायचे आहे. जननायक जनता पक्षात काम केल्यास ते शक्य होणार नसल्याने त्यांनी जेजेपी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जननायक जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तसेच फोगट यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे बबिता आणि महावीर फोगट यांचा भाजपला निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी