मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या मालिकेतली दयाबेन ची भूमिका साकारणारी दिशा वाकानीने मालिका सोडल्याची माहिती दिली आहे. पण आता “तारक मेहता…”ला नवीन दयाबेन मिळाल्याची बातमी समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासू दयाबेन मालिकेमध्ये परत येणार का? याबाबत अनेक चर्चा चालू होत्या. पण आता या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. दिशाला मालिकेमध्ये काम करणे शक्य नसल्यामुळे नवीन दयाबेनचा शोध सुरु होता. आता हा शोध संपला आहे. या मालिकेमध्ये नवीन दयाबेन मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी अभिनेत्री राखी विजनची निवड करण्यात आली आहे. याबाबतीती निर्मात्यांनी कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही. पण राखी दयाबेनच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं बोललं जात आहे. राखी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राखीने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.‘नागिन ४’, ‘देख भाई देख’, ‘बनेगी अपनी बात’ या प्रसिद्ध मालिकांमध्ये राखीने काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या :