‘सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकर्यांवर नांगर फिरवण्याचे काम’

टीम महाराष्ट्र देशा –  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकर्यांच्या मतदानाचा अधिकार महाविकास आघाडीने रद्द केल्याने माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी सरकारवर परखड टीका करत हा निर्णय शेतकर्यांवर नांगर फिरवण्याचे कामअसल्याचे म्हटले आहे.

२०१७ मध्ये तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार क्षेत्रात राहणार्या किमान १० आर. जमीन धारण करणार्या आणि बाजार समितीमध्ये आपल्या कृषी उत्पन्नाची विक्री करणार्या शेतकर्याला मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील लाखो शेतकर्यांना मतदानाचा अधिकार मिळाला होता.

Loading...

मात्र बुधवारी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णयही रद्द करण्यात आला. त्यावर बोलताना आ. देशमुख म्हणाले की, हे सरकार स्थगिती सरकार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले सर्व चांगले निर्णय हे सरकार रद्द करत आहे.

बाजार समितीमधील शेतकर्यांचा मतदानाचा हक्क काढून सरकारने शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. बाजार समिती ही शेतकर्यांची असते. शेतकर्यांच्या कष्टाला न्याय मिळावा म्हणून भाजप सरकारने बाजार समितीमध्ये शेतकर्यांना मतदानाचा हक्क दिला होता. आता शेतकर्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यामुळे शेतकर्यांचा आदर कमी होणार आहे. अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...