हा देश गांधीजींचा आहे तो गांधीजींच्याच विचाराने चालेल : कॉंग्रेस

gandhi ,nathuram

टीम महाराष्ट्र देशा :  कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या नथुराम गोडसे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. हा देश गांधीजींचा आहे तो गांधीजींच्याच विचाराने चालेल असा आशयाची पोस्ट सचिन सावंत यांनी ट्विटरवर केली आहे.

नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल. असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. दरम्यान त्यांच्या त्या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरादार निशाणा साधला.

याचदरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही टीकास्त्र सोडले. नथुराम गोडसे सारख्या अतिरेक्याला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा ठाकूर हीच्या मुखातून भाजपा, संघ, अमित शाह आणि मोदी स्वत: बोलत आहे. असे सचिन सावंत यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, अतिरेक्याला उमेदवारी देणारा भाजपा व ठाकूर गोडसेच्या विचारांचे असून देशद्रोही आहेत. हा देश गांधीजींचा आहे तो गांधीजींच्याच विचाराने चालेल. असेही त्यांनी म्हंटले.