हा देश हिंदुंचा ! मुस्लीमांनी त्यांच्यासाठी पाकिस्तान तयार केला आहे- भाजप आमदार

बेळगाव: भाजपच्या नेत्यांचे वादग्रस्त विधान करण्याचे सत्र सुरुच आहे. भाजपचे बेळगाव ग्रामीणचे उमेदवार, आमदार संजय पाटील यांनी ‘हा देश हिंदुंचा आहे’, मुस्लीमांनी त्यांच्यासाठी पाकिस्तान तयार केला आहे असे वादग्रस्त विधान केले आहे.

संजय पाटील म्हणाले, कर्नाटकमधली विधानसभा निवडणूक हिंदू-मुस्लिम अशीच आहे. पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच कॉंग्रेसने लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

यापूर्वी सार्वजनिक सभेत जातीय तणाव निर्माण करणारे भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवत आमदार संजय पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.