‘या’ देशाने दर्शवली आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी

IPL Trophy

दुबई : जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआय सह बहुतांश क्रिकेट बोर्डांनाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएलचा १३ वा मोसम मार्च महिन्यात सुरू होणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलली गेली.

‘कोरोनाला हरवण्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व करणार’, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला निर्धार

गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली. काही देशातील खेळाडूंनी यानुसार सरावाला सुरुवातही केली आहे. मात्र असे असले तरीही ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर टांगती तलवार आहे.

दरम्यान,यंदाच्या वर्षीचं आयपीएल आता कधी आणि कुठे होणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण युएईच्या अमिरात क्रिकेट बोर्डाने आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार युएई क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याची ऑफर दिली आहे.

गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन कराव लागेल – उद्धव ठाकरे

‘युएईमध्ये याआधीही आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं, तसंच द्विदेशीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धाही युएईमध्ये खेळवल्या गेल्या’, असं युएई बोर्डाचे महासचिव मुबाशशिर उस्मानी म्हणाले आहेत.