पुणे कॉंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; ‘या’ जेष्ठ नेत्याने ठोकला पक्षाला राम-राम

पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज पुण्यात आहेत. मात्र पुणे शहर कॉंग्रेसमधील गटबाजी काही केल्या संपताना दिसत नाही. ‘गांधींच्या स्वागतासाठी शहरातील निवडक पदाधिकारी आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ पदाधिकारी जातात, मात्र, आपण जाऊ शकत नाही’, अशी नाराजी व्यक्त करून काँग्रेसचे दिग्गज नेते गोपाळ तिवारी यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे.

तिवारी यांनी क्रियाशील आणि प्रदेश काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तिवारींच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसच्या कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. पक्षसंघटनेत उत्तरदायित्वाचा अभाव, संकुचित वृत्ती आणि कुटील राजकारण शिरल्याचा गंभीर आरोपही तिवारी यांनी केला.

‘राहुल गांधी पुण्यात आले असतानाही मी त्यांना भेटू शकत नसेन, तर क्रियाशील – पदाधिकारी म्हणून काम करण्याला अर्थ उरत नाही’ अशी खंत मांडणारे राजीनामापत्रच तिवारी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविले आहे.