बीडच्या राजकारणातील कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे ‘हे’ दोन बडे नेते वंचित आघाडीमध्ये ?

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या राजकारणात कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाला ग्रहण लागलं असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि काँग्रेसचे नेते राजेसाहेब देशमुख हे लवकरच वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन बड्या नेत्यांच्या जाण्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

पृथ्वीराज साठे आणि़ राजेसाहेब देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडी विधानसभेसाठी घेत असलेल्या मुलाखतीला हजेरी लावली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या दोन महत्वाच्या नेत्यांनी वंचितच्या मुलाखतीला हजेरी लावल्याने बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधी राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जयदत्त क्षीरसागर यांच्या जाण्याने बीडच्या राजकारणात राष्ट्रवादीला एक प्रकारचे खिंडारचं पडले. मात्र आता पृथ्वीराज साठे आणि़ राजेसाहेब देशमुख यांनी देखील कॉंग्रेस आघाडीला सोडत वंचित आघाडीमध्ये जाण्याचा विचार केला असल्याचं सांगितल जात आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणातून कॉंग्रेस आघाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.