Share

Upcoming Budget Cars | 10 लाखांपेक्षा कमी किमतीत लाँच होऊ शकतात ‘या’ कार

टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षामध्ये तुम्ही जर कार (Car) घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण भारतीय बाजारामध्ये लवकरच बजेट (Upcoming Budget Cars) मध्ये काही गाड्या लाँच होणार आहेत. या गाड्यांची किंमत दहा लाखांपेक्षा कमी असू शकते. यामध्ये SUV, MPV आणि हॅचबॅक कार यांचा समावेश आहे.

मारुती सुझुकी बलेनो क्रॉस

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती नेहमी आपल्या कार अपडेट करून बाजारामध्ये सादर करत असते. यामध्ये मारुती आपली मारुती सुझुकी बलेनो क्रॉस ही अपडेट करून तयार करत आहे. नुकतीच ही SUV चाचणी दरम्यान दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही कार ऑटो एक्स्पो 2023 मध्ये लाँच करू शकते. मारुतीच्या या कार मध्ये 1L बूस्टरजेट टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह बाजारात सादर केले जाऊ शकते. त्याचबरोबर कंपनी ही कार 9-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, हेड अप डिस्प्ले, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (ACC), समोर हवेशीर सीट, 6 सह प्रीमियम साउंड सिस्टम इत्यादी वैशिष्ट्यसह लाँच करून शकते. कंपनीकडून अद्याप या कारच्या किमतीबद्दल कोणती माहिती मिळालेली नाही.

महिंद्रा इलेक्ट्रिक KUV100

ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा जानेवारी 2023 मध्ये मायक्रो SUV महिंद्रा इलेक्ट्रिक KUV100 लाँच करू शकते. या कारमध्ये 15.9kWh क्षमतेचे लिक्विडकुल्ड बॅटरीपॅक असलेले BLDC इलेक्ट्रिक मोटर असू शकते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जर 150 ते 175 किलोमीटर पर्यंत धावू शकते. कंपनी ही इलेक्ट्रिक कार दहा लाखापर्यंत लाँच करू शकते. पण कंपनीकडून अद्याप या इलेक्ट्रिक कारच्या किमतीबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाही.

स्कोडा फोबिया 2023

स्कोडा फोबिया 2023 ही कार अपडेटेड डिझाईन, फीचर आणि स्पेसिफिकेशन सह बाजारात लाँच होऊ शकते. ही कार दोन इंजिन पर्याय सह बाजारात उपलब्ध होऊ शकते. यामध्ये पहिले इंजिन 1.0L पेट्रोल इंजिन असेल, जे 80PS पॉवर आणि 93Nm टार्क निर्माण करू शकते. तर, यामधील दुसरे इंजिन 1.0L TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 110 PS पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. कंपनीची ही कार दहा लाखापर्यंत बाजारामध्ये सादर केली जाऊ शकते. मात्र, कंपनीकडून या कारच्या किमतीबद्दल कुठली माहिती मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षामध्ये तुम्ही जर कार (Car) घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now