कोविड लसीकरण प्रमाणपत्रात चूक झाल्यास असे करता येणार बदल

लसीकरण कोविन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात कोरोना रुग्णांची संख्या ही अधिक वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला गेला आहे.

ज्या नागरिकांनी लस घेतली आहे त्या नागरिकांच्या मोबाईलवर प्रमाणपत्र पाठवलं जातं. परंतु अनेकदा या प्रमाणपत्रात व्यक्तीच्या नावात, जन्मतारखेत चूक असते मात्र आता यावर उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने प्रमाणपत्रात सुधारणा करण्याची सुविधा केली आहे. आता तुम्ही कोविन पोर्टलवर जाऊन कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्रातील चूक दुरस्त करू शकणार आहात.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सांगितले की, सरकारने कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्रातील चुका सुधारण्यासाठी कोविन अँपवर एक नवीन फिचर जोडले आहे. आरोग्य सेतू ट्विटर हँडलवर पोस्ट केल्याप्रमाणे आता तुम्ही कोविड प्रमाणपत्रात नाव, जन्मतारीख आणि जेंडर यातील चुका सुधारू शकता.

कसे बदल करणार ??

  • तुम्हाला http://cowin.gov.in यावर लॉग इन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रात दुरुस्ती असा नवा पर्याय समोर दिसेल.
  • लॉगिन झाल्यावर रेज इन इश्यू वर तुम्हाला क्लिक करावं लागेल. हे फिचर लॉगिन केल्यानंतर राइड साइडला सर्वात वर दिसून येईल.
  • तुम्हाला लाभार्थीचं नाव निवडावं लागेल. त्याचसह त्याच्या खाली करेक्शन इन सर्टिफिकेट बटण दाबावं लागेल. त्यानंतर खाली आल्यावर ३ पर्याय दिसतील. जेंडर आणि ईयर ऑफ बर्थ. यातील जी तुमच्या
  • प्रमाणपत्रात चूक असेल तिला सिलेक्ट करा. यात १ किंवा ३ पर्यायात चुका सुधारण्यासाठी केवळ १ संधी मिळेल. म्हणजे जसं तुम्ही नाव निवडलं.
  • खाली येऊन बरोबर करून विविध कॉलम येतील. तेथे तुम्ही नाव, डेट ऑफ बर्थ अथवा जेंडर चुकीचं असेल ते बरोबर करू शकता.

महत्वाच्या बातम्या

IMP