fbpx

हे अर्थसंकल्प देशाच्या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार – अमित शहा

नवी दिल्ली : भाजप सरकारच्या काळातला हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून हे अर्थसंकल्प सादर करण्यात आलं आहे. नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला.

तर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हे बजेट शेतकरी, कामगार, मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणार बजेट असणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देण्याची विशेष तरतूद देखील या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतून शेकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. असे अमित शहा म्हणाले.

एका बाजूला अमित शहा अर्थसंकल्पाचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले अर्थसंकल्पाने अपेक्षा भंग केल्याच म्हणत आहेत. देशाच्या अर्थसंकल्पात यावर्षी तरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती पण तस न होता या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे.या अर्थसंकल्पातून शेतीला संकटातून सावरण्यासाठी ठोस आर्थिक धोरणे आखण्याची अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. याउलट पी.एम. किसान योजने अंतर्गत महिन्याला पाचशे रुपये जीवन जगण्यासाठी तुटपुंजी मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.